Alandi: आळंदी नगरपरिषद येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त कर्मचारिकेच्या हस्ते ध्वजारोहण

एमपीसी न्यूज – काल 1 मे महाराष्ट्र दिना निमित्त तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत  (Alandi)आळंदी नगरपालिका येथे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या उपस्थित पालिका सफाई कर्मचारीका  मालनताई पाटोळे मॅडम यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून  राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताने राष्ट्ध्वजास मानवंदना दिली.यावेळी आळंदी पालिका आधिकारी व कर्मचारी वर्ग , विद्यार्थी उपस्थित होते.तसेच आळंदी पोलीस स्टेशन व आळंदी ग्रामीण रुग्णालयात ही ध्वजारोहण करून राष्ट्ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताने ध्वजास मानवंदना दिली.

Pimpri : संत तुकारामनगरमधील  बैठकीत महायुतीच्या यांच्या विजयाचा निर्धार

 

कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षा काळे, संदीप वालकोळी व रामदास वहिले या शिक्षकांचा प्रशालेत केलेल्या गौरवास्पद कार्यामुळे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.डॉ. दीपक पाटील,अजित वडगांवकर,हर्षवर्धन पवार,सोमनाथ मोरे,रवींद्र उंद्रे,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उध्दव डिघोळे,उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे,  पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, शिक्षक प्रतिनिधी दत्तात्रय वंजारी, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, चरित्र समितीचे सदस्य विलास वाघमारे, भाऊसाहेब पाटील, ज्ञानेश्वर जाधव, चंद्रकांत गोरे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

तसेच काल 1 ते 9 वी वार्षिक परीक्षा निकाल वाटप करण्यात आले. त्यात विशेष बाब म्हणजे इयत्ता 6 वी अ व 7 वी अ चे वर्गशिक्षक श्रीकांत घुंडरे व योगेश मठपती यांनी वर्गात प्रथम तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी, विषयात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक व वर्षभरात ज्या विद्यार्थ्यांनी 100℅ उपस्थिती नोंदवली त्यांना गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. निकाल घेण्यासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व प्रदीप काळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.