Bopkhel : खासदार बारणे यांनी साधला बोपखेल, फुगेवाडीत मतदारांशी संवाद

एमपीसी न्यूज –  बोपखेल व फुगेवाडी भागात प्रचार दौरा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील(Bopkhel) शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी (बुधवारी) मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच मतदारांशी संवाद साधला. ठिकठिकाणी फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

बोपखेल येथील उत्सवानिमित्त ग्रामदैवत बापूजीबुवा महाराज मंदिरात जाऊन (Bopkhel)खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले तसेच निखिल येवले, उमेश पाटील, कार्तिक गोवर्धन, नामदेव घुले, संतोष राठोड, प्रसाद माळेगावकर, किरण दवणे, पराग मोरे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

माजी उपमहापौर हिराबाई गोवर्धन घुले, चेतन घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शशिकांत घुले, छत्रपती पुरस्कार विजेते कबड्डीपटू राजू ज्ञानोबा घुले, वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य श्रीरंग धोदाडे, पोलीस पाटील पांडुरंग गणपत घुले, माझे सरपंच विठ्ठल पिराजी घुले, युवा नेते अतुल नामदेव घुले, मनसेचे प्रथमेश राजू घुले, उद्योजक कमलेश राजेंद्र घुले, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश देवकर‌ तसेच सचिन झपके, संतोष घुले आदींच्या निवासस्थानी जाऊन बारणे यांनी निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली.  दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला खासदार बारणे उपस्थित होते.

फुगेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बारणे यांनी प्रचाराची सुरुवात केली. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक प्रशांत फुगे तसेच निलेश हाके, हेमंत फुगे, यशवंत वाखारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी दादा ढवाण, बाळासाहेब ढवाण, केशव वाखारे, मनोज वाखरे, माजी नगरसेविका उषा वाखारे, संध्या गायकवाड आदींच्या निवासस्थानी बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. श्रावस्ती बुद्ध विहारात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. दापोडी येथे हर्षल मोरे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. सर्व ठिकाणी बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले व निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.