Chinchwad : कामगार दिनानिमित्त कष्टकरी कामगारांना श्रमप्रतिष्ठा पुरस्कार

एमपीसी न्यूज -एक मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने (Chinchwad)कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,क्रांती कष्टकरी असंघटित कामगार कल्याणकारी संघातर्फे आज चिंचवड येथे विशेष नैपुण्य मिळवलेल्या असंघटीत कष्टकरी कामगारांना श्रमप्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते,  प्रमुख पाहुणे म्हणून(Chinchwad) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कामगार नेते अरुण गराडे, सचिव तुषार घाटुळे,राजू  हरगूडे, राजु बिराजदार, हौसराव शिंदे,माधुरी जलमूलवार,लक्ष्मी गायकवाड,किरण साडेकर,ज्योती इनामके, यशवंत होळकर,आदी उपस्थित होते.

 

श्रमप्रतिष्ठा पुरस्कारामध्ये बांधकाम कामगार -हनुमंत नरवडे, रिक्षाचालक- शीलाताई दिंडे, सफाईकामगार – सुभाष चाबुकस्वार, घरेलूकामगार शिला काळे, फेरीवाला -यासीन शेख, सुरक्षारक्षक- सुभाष लष्करे यांना शाल, श्रीफळ, पुस्तकासह श्रम प्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

Chinchwad : मराठा महासंघ, खान्देश तिळवण तेली समाज मंडळाचा महायुतीला पाठिंबा

कार्यक्रमाची सुरुवात शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून तसेच प्रभाकर वाघोले यांनी  महाराष्ट्र गीत सादर करून सुरुवात झाली.

यावेळी पुरुषोत्तम सदाफुले म्हणाले की कामगाराची स्थिती आता बदलत चाललेली आहे पूर्वीच्या कामगारांना आधार  कामगार कायदे होते मात्र आता त्यांचा आधार संपुष्टात येत आहे कामगारांसाठी हिताच्या कामगारांच्या हितासाठी लढणाऱ्या संघटनांची संघटनांचा अभाव असून या कालावधीमध्ये कामगारांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपल्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच महिलांची संख्या लक्षणीय वाढत असून ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात असतात तिथे विजय निश्चित असतो असे त्यांनी नमूद केले.

 

 

कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्यची 75 वर्षानंतरही  कामगारांना हक्कासाठी झगडावे लागत असून कामगारावरती विविध प्रकारचे अन्याय केले जात असून ते सहन करून कामगार आजही ठामपणे उभा आहे. केंद्र सरकारने अन्यकारक केलेल्या चार सही श्रम संहिता रद्द करणे गरजेचे आहे. तसेच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळावी.

 

विविध कामगारांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या भावनांना वाट करून दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
बालाजी लोखंडे,सुरज देशमाने,संतोष माळी, युवराज निलवर्ण,निरंजन लोखंडे,सलीम डांगे, सुशेन खरात, संभाजी वाघमारे, शेषनारायण खंकाळ, नंदा तेलगोटे,जरिता वाटोरे, मुमताज शेख, सुनिता पोतदार,वृषाली पाटणे,स्वाती पालके,प्रियांका काटे, अर्चना कांबळे, विजया पाटील,महादेवी बिल्डर, मीनाक्षी टोम्पे,भारती धुरंदरे, ललिता बारोठ आदींनी परिश्रम घेतले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.