Vadgaon Maval : सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ शनिवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त, वडगावचे माजी सरपंच ( Vadgaon Maval) सोपानराव बाबुराव म्हाळसकर (वय 82) यांचे रविवारी (दि. 21 ) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ शनिवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वडगावचे सरपंच असताना गावाच्या विकासासाठी व तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या धार्मिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उद्या शनिवार दि.27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण येथे जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune : अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

 स्वर्गीय आण्णांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सर्वांना उपस्थित रहाण्याची विनंती तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान, सर्व विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ वडगाव मावळ तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळ, मावळ तालुका आदींकडून करण्यात ( Vadgaon Maval) आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.