Sangvi : घरगुती सिलेंडरमधून करायचा गॅसची चोरी; पोलिसांनी ठोकल्या तरुणाला बेड्या

एमपीसी न्यूज – घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून चार किलो वजनाच्या लहान सिलेंडरमध्ये चोरून गॅस काढला जायचा. हे सिलेंडर काळ्या बाजारात वाढीव दराने विकले जात होते. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कारवाई करत एका तरुणाला अटक केली (Sangvi) आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) दुपारी दीड वाजताच्या सुमारास शितोळेनगर, सांगवी येथे करण्यात आली.

 

श्याम उर्फ लखन वामनराव लांडगे (वय 25, रा. शितोळेनगर, सांगवी. मूळ रा. कर्नाटक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गुट्टे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला 43 हजारांचा दारूसाठा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्याम लांडगे हा अंकित गॅस हे दुकान चालवत होता. त्याने त्याच्या दुकानात घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडर मधून रिफिलिंग नोजलच्या सहाय्याने धोकादायकपणे चार किलो वजनाच्या सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढला. हे लहान सिलेंडर तो वाढीव दराने विकत असे. याबाबत खंडणीविरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी दुकानावर छापा मारून कारवाई करत श्याम याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 13 हजार 950 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले(Sangvi) आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.