Dehuroad : मोक्का न्यायालयाने तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – मोक्का विशेष न्यायालयाने पुणे जिल्ह्यात येण्यास बंदी घेतलेला आरोपी कोणत्याही परवानगीशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला. त्याने स्वतःकडे(Dehuroad) बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गारुडीवस्ती,देहूरोड येथे करण्यात आली.

बुग्गी उर्फ मोबिन सलीम शेख (वय 29, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुट्टे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Sangvi : घरगुती सिलेंडरमधून करायचा गॅसची चोरी; पोलिसांनी ठोकल्या तरुणाला बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी बुग्गी हा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला शिवाजीनगर येथील विशेष मोक्का न्यायालयाने पुणे जिल्हा हद्दीत येण्यास बंदी घातली आहे. हा आदेश रद्द अथवा निवासस्थानी येण्याची परवानगी न घेता आरोपी शेख हा बेकायदेशीरपणे देहूरोड येथे आला.त्याने स्वताकडे पिस्तूल बाळगले. याबाबत गुन्हे शाखा युनिट-5 ला माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लाऊन बुग्गी शेख याला ताब्यात घेतले.त्याच्याकडून 40 हजारांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन हजार रुपये(Dehuroad) किमतीची दोन काडतुसे जप्त केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.