Talegaon Dabhade : पुणे पीपल्स को ऑप. बँक लि. बँकेच्या तळेगाव शाखेचा 24 वा वर्धापन दिन होणार नवीन वास्तूत

एमपीसी न्यूज – पुणे पीपल्स को ऑप. बँक लि. या बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे सॅमसन नगर कॉलनी, तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे स्थलांतर झाले आहे. या नव्या वास्तूत बँकेचा 24 वा वर्धापन दिन व ग्राहक स्नेह मेळावा सोमवारी (दि. 6) साजरा(Talegaon Dabhade) होणार आहे.

 

त्यानिमित्त सोमवारी दुपारी 12 ते 2 या कालावधीत सभासद,खातेदार, ठेवीदार,व्यापारी व स्थानिक पदाधिकारी यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. त्याप्रसंगी अध्यक्षांसह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे यांनी दिली.

 

तळेगाव दाभाडे शाखेने नुकतेच नवीन वास्तूत स्थलांतर केले आहे. शाखेचा 24 वा वर्धापन दिन या नव्या वास्तूत साजरा केला जात आहे.त्यानिमित्त सोमवार(दि 6 ) श्री सत्यनारायण महापूजा आणि ग्राहक स्नेह मेळावा आयोजित केला आहे.

 

खातेदार,ठेवीदार,सभासद,व्यापारी, कर्जदार तसेच नागरिक बंधू भगिनींनी  सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळात तीर्थप्रसादास आणि ग्राहक मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती बँकेकडून करण्यात आली आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष सी.ए. जनार्दन रणदिवे, उपाध्यक्ष मिलिंद वाणी, संचालक व अध्यक्ष, व्यवस्थापकीय मंडळ, अॅड. सुभाष मोहिते, ज्येष्ठ संचालक बबनराव    ब.भेगडे,श्रीधर भि. गायकवाड,डॉ. रमेश कि.सोनवणे,सुभाष मा. नडे,सुभाष वि.गांधी,संजीव ना. असवले, कालीदास ज.शेलार,निशा य.करपे,श्वेता कि.ढमाळ(Talegaon Dabhade) उपस्थित राहणार आहेत.

तसेच,बिपीनकुमार हि.शहा,वैशाली सं. छाजेड,विश्वनाथ ग. जाधव,मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.)संजय प्र.भोंडवे, व्यवस्थापकीय मंडळ सदस्य कौस्तुभ भेगडे,सी.ए.अजिंक्य रणदिवे,उदय जगताप,अरुण डहाके, राजेंद्र गांगर्डे शाखाव्यवस्थापक, सारंग शहापूरकर व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.