Alandi : सिद्धबेट येथे वारकरी सांप्रदायिक भक्ती आणि ज्ञानयोग शिबिराची सांगता

एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची आयोजित वारकरी  सांप्रदायिक भक्ती ज्ञान योग शिबिराचा प्रारंभ दि.28 रोजी भक्त निवास ,(श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान) आळंदी येथे झाला होता. त्या शिबिराची सांगता आज (दि.5 मे) रोजी सिद्धबेट येथील (आळंदी नगरपरिषद) वारकरी सभागृह(Alandi) मध्ये झाली.

 

 

संत परंपरा वारकरी संप्रदाय आणि पंढरपूर वारी हा महाराष्ट्राचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा आहे.भावी पिढीला हा वारसा शास्त्रशुद्ध पद्धतीने मिळावा यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी यांनी श्रीक्षेत्र आळंदी व शहर  परिसरातील लहान मुलांसाठी हे उन्हाळी शिबिर आयोजित केले होते.या शिबिरात संत चरित्र,हरिपाठ,टाळ वादनाचे प्रशिक्षण अभंग परिचय व गायन ,ध्यान व श्रीमद भगवद्गीता 15 वा अध्याय हे विषय शिकवले गेले.आज संत चरित्रमध्ये संत मिराबाई यांचे  चरित्र हभप रोहन गिरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.या शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी भीमसेन महाराज शिंदे हे टाळ,अभंग शिक्षणासाठी कार्यरत होते. उमेश महाराज बागडे या शिबिराचे अध्यापक म्हणून कार्यरत होते.या शिबिराची संकल्पना विलास काटे यांची असल्याचे यावेळी उमेश  बागडे यांनी सांगितले.

 

               

विश्वस्त योगी निरंजननाथ यावेळी म्हणाले, सर्व काही माऊली करून घेत आहेत.आळंदीकर ग्रामस्थ व शहर परिसरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले.पुढील (दिवाळी सुट्टीच्या) शिबिरात वारकरी शिक्षणा सोबत विविध खेळांचे आयोजन असल्याचे त्यांनी संकेत दिले.या शिबिरातील मुलांच्या पालकांनी जे शिबिरात शिकवले त्याचा सराव मुलांकडून घरी घेण्यात यावा.असे यावेळी योगी निरंजननाथ म्हणाले.

 

मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नवयुग व नवपिढी याबाबत माहिती देत मार्गदर्शन केले.शिबिरातील विषया संदर्भात मुलांना प्रश्न केले. मुलांनी त्या विषयासंदर्भातील उत्तरे दिली.तसेच यावेळी सिद्धबेट बाबत मुलांना माहिती देण्यात आली.

 

यावेळी या शिबिरास विश्वस्त भावार्थ  देखणे ,डॉ. विजय कुमार फड  यांचे मार्गदर्शन लाभले. तर  शिबिरात सहभागी झालेल्या मुलांच्या काही पालकांनी या शिबिरा विषयी मनोगत व्यक्त केले.व या शिबिरात सहभागी झालेल्या मुलांना देवस्थान तर्फे प्रमाणपत्र, माऊलींची प्रतिमा व बास्केट बॉल देण्यात आले.यावेळी देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संभाजीराजे कुऱ्हाडे,संदेश कुऱ्हाडे, सुदीप गरुड,बापू येळवंडे ,श्रीधर सरनाईक व विद्यार्थ्यांचे पालक ,देवस्थान कर्मचारी,इतर मान्यवर उपस्थित(Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.