Loksabha Election : जय पवार मनोज जरांगे यांच्या भेटीला….. चर्चांना आले उधाण

एमपीसी न्यूज : सध्या सर्वत्र बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा चालू असून सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गट ) जिंकणार का सुनेत्रा पवार(राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट) बारामतीचा गड राखणार याची उत्सुकता सगळीकडे लागली असतानाच इकडे अजित पवार यांचे धाकटे चिंरंजीव जय पवार यांनी मराठा आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांची आज भेट घेत असल्याने चर्चेला उधाण(Loksabha Election) आले आहे.

 

दिनांक (7 मे) रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर जय पवार(राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट) यांनी आज(दि.5 मे) रोजी मुंबईहून छत्रपती संभाजीनगर येथे हेलिकॉप्टरने प्रयाण केले.छत्रपती संभाजीनगर येथून कारने कोणालाही थांगपत्ता न लागता थेट अंतरवाली सराटी गाठले . तिथे त्यांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर आगतस्वागताचा कार्यक्रम पार पडला. जय पवार यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले असले तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जय पवार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही खरंच सदिच्छा भेट होती का अजून काही? असा प्रश्न महाराष्ट्रातील(Loksabha Election) जनतेला पडला आहे.

 

Loksabha Election : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथे पोलिसांचा रूटमार्च

 

गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ओबीसी कोट्यातून मराठा समाज आणि  सगेसोयरे यांना आरक्षण मिळावे म्हणून झटत आहेत.यादरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेची धनी बनविले आहे. मनोज जरांगे यांच्यामुळे राज्य सरकारला मराठा आरक्षण कायदा मंजूर करण्यास भाग पाडले होते तरीही आपल्या समाजाला आणि सगेसोयरे यांना लोकशाही मार्गाने ओबीसीमधूनच आरक्षण मिळाले पाहिजे अशी ठाम भूमिका घेऊन बसलेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.