Maval : मावळात उद्यापासून प्रचाराचा धडाका; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गडकरी व गोविंदाही!

एमपीसी न्यूज –  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष( Maval) महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नामवंत अभिनेता गोविंदा या मान्यवरांच्या सभा व रोड शो होणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी दिली.

रविवारी (5 मे) संध्याकाळी पाच वाजता लोकप्रिय अभिनेता गोविंदा यांच्या हस्ते  महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Maval)यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे हे निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभानंतर पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव भागात गोविंदा यांचा रोड शो होईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी (6 मे) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे तर पनवेल मध्ये खारघर येथे प्रचार सभा घेणार आहेत. रहाटणी येथील कापसे लॉन्स येथे दुपारी दोन वाजता तर खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पाच वाजता त्यांची सभा होणार आहे.

Pune: मोदी सरकारने 2014 पासून उच्चशिक्षणावर विशेष भर दिला-  निर्मला सीतारामन

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी (7 मे) संध्याकाळी सहा वाजता कर्जत तालुक्यातील चौक फाटा मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (9 मे) पिंपरी-चिंचवडमध्ये एक सभा मावळ विधानसभा मतदारसंघात एक सभा घेणार आहेत.

निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी (11 में) पिंपरी-चिंचवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोने होईल. त्यानिमित्त महायुतीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.