Pune: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा उद्योजकांशी वार्तालाप

एमपीसी न्यूज -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज त्यांच्या (Pune) पुणे भेटीत ज्येष्ठ उद्योजक, व्यवसायिक, माजी शासकीय अधिकारी, चार्टर्ड अकौंटंट अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवरांशी संवाद साधला.

 

ज्येष्ठ उद्योजक आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदीया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बाबा कल्याणी, राहुल किर्लोस्कर, सुप्रिया बडवे, जगदीश कदम, सुधीर मेहता, दीपक करंदीकर, पांडुरंग राऊत, डॉ. दीपक शिकारपूर, मनोज पोचट, सुधीर पंडीत, सुशील जाधव ,एअर मार्शल भूषण गोखले असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे विश्‍वस्त प्रदीप रावत, कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव सुधीर वैशंपायन आदींनी सर्वांचे स्वागत केले.

 

श्री. फिरोदिया यांनी भांडारकर संस्थेच्या वतीने अर्थमंत्र्यांचे स्वागत करुन भारताची विकसित आणि महाशक्तीकडे वाटचाल सुरु असतांना मोदी सरकारच्या कोणत्या नवीन कल्पना आहेत, यावर अर्थमंत्र्यांना बोलते केले तर उपस्थितींच्या विविध प्रश्‍नांवर अर्थमंत्र्यांनी मोकळपणाने संवाद साधला. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रदीप आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी एज्युनॉमिक्स रिसर्च फोरमचे इंद्रनिल चितळे व सौरभ पटवर्धन यांनी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचे व्हीजन डॉक्युमेंट पुढील नियोजनाच्यादृष्टीने अर्थमंत्र्यांना सादर केले.

 

Mahalunge :  म्हाळुंगे येथे गावठी दारुसह 2 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

यावेळी बोलतांना अर्थमंत्री सितारामन म्हणाल्या की, भांडारकर सारख्या प्राचीन संस्थांनी ज्याप्रकारे संशोधन केले आहे आणि आपल्या संस्कृतीचे संवर्धन केले आहे, त्याचे विशेष कौतुक आहे. आपल्या देशाची संस्कृती आणि इतिहास जगात अद्वितीय अशी आहे, याची जगाला पुन:ओळख करुन देण्याची आवश्यकता आहे.

 

विकसित देशाकडे वाटचाल होत असतांना तळागाळातील सर्वसामान्यांना देखील बरोबर घेऊन जायचे आहे, त्यामुळे सशक्त भारत हा केंद्रबिंदू कायम ठेवला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सभ्यतेची मूल्ये कमी होऊ लागली आहेत, त्यावर चिंतन व्हायला हवे. त्यादृष्टीने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायला हवा, त्यासाठी मोदी सरकारच्या विशेष योजना सुरु आहेत, ज्याचे अर्थव्यवस्थेत प्रतिबिंब दिसायला लागले आहे. ग्रामविकासामुळेच महाशक्ती होण्याचा भारताचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. कोरोना काळानंतर अन्य देशांच्या तुलनेत आपण खूप मोठी कामगिरी नोंदवत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.