Today’s Horoscope 05May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 05May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार

तारीख -05.05.2024.

शुभाशुभ विचार – 8.00 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – प्रदोष.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा 19.57 पर्यंत नंतर रेवती.

चंद्र राशी – मीन.

—————————–

मेष- ( शुभ रंग- पांढरा)

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवास होतील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच होईल. वाणीत गोडवा असू द्या.

मिथुन (शुभ रंग – मरून)

मित्रमंडळींना दुरूनच रामराम करून आज आपल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानाला कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

सिंह ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नवीन व्यवसायात भागीदारांमध्ये काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. जोडीदाराच्या चुका काढायची चूक आज करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा.

कन्या (शुभ रंग- लाल )

कुटुंबात आज खेळीमेळीचे वातावरण असेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास तुम्ही प्राधान्य द्याल. व्यवसायात भागीदारांमध्ये सुसंवाद असून योग्य निर्णय घेऊ शकाल.

तूळ (शुभ रंग- आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

वृश्चिक ( शुभ रंग- केशरी)

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी उत्तम संधी चालून येतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. जीवाची मुंबई करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

धनु (शुभ रंग- भगवा)

स्थावर शेतीवाडी संबंधित रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. गृह उद्योग करणाऱ्या महिलांना कर्ज मंजुरी होऊ शकते. मुलांकडून पालकांच्या अपेक्षा पूर्ण होतील.

मकर (शुभ रंग- जांभळा)

आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पा मधे तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

कुंभ ( शुभ रंग- डाळिंबी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस अगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

मीन ( शुभ रंग- निळा)

आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात रहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टाहास राहील. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय मात्र अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्या.

 

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.