Loksabha Election : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथे पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज – लोकसभेची निवडणूक, शांततापूर्वक, निष्पक्षपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलिसांकडून तयारी केली जात आहे. रेकोर्डवरील गुन्हेगारांना कायद्याच्या भाषेत तंबी देण्यासाठी परिसरात रूटमार्च काढून नागरिकांमध्ये सुरक्षित(Loksabha Election) वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

शनिवारी (दि. 4 मे) रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन रूटमार्च काढण्यात आले. सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते सात वाजताच्या कालावधीत हे रूटमार्च काढले गेले. दोन्ही वेळी सुमारे चार-चार किलोमीटरच्या(Loksabha Election) अंतरावर हा रूटमार्च झाला.

Pune: उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात , चंद्रकांत पाटील यांची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना विनंती 

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील झोपडपट्टी, महत्त्वाची ठिकाणे, बाजारपेठ परिसरात घेण्यात आलेल्या रूटमार्च मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांसह केंद्रीय दलाचे 200 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.