Pimpri : माहिती अधिकारात माहिती देण्यास पीएमआरडीए कडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) येथे शहर(Pimpri )नियोजन अधिकारी पदावर कार्यरत असलेले विवेक खरवडकर यांना पाठीशी घालण्यासाठी पीएमआरडीए कडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी केला आहे. प्रदीप नाईक यांनी विवेक खरवडकर यांच्याबाबत माहिती मागवण्यासाठी अर्ज केला असता पीएमआरडीए प्रशासनाकडून त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदीप नाईक यांनी याबाबत माहिती दिली. नाईक म्हणाले, विवेक खरवडकर(Pimpri )हे पुणे महापालिकेत नियुक्तीस होते. तिथून प्रतिनियुक्तीवर ते पीएमआरडीए येथे आले. पीएमआरडीए येथे कार्यरत असताना त्यांच्याकडे शहर नियोजन विभागाची जबाबदारी देण्यात आली. तिथे कार्यरत असताना त्यांनी अनेक चुकीच्या कामांना परवानगी दिली. तसेच त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला.

Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा ‘मोका पॅटर्न’; 63 गुन्हेगारी टोळ्या तुरुंगात

त्यामुळे विवेक खरवडकर यांच्या शासकीय कामाबद्दल माहिती अधिकारातून माहिती मागवली असता पीएमआरडीए प्रशासनाकडून ती माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवल्या नंतर 30 दिवसात माहिती देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, असे असताना देखील पीएमआरडीए प्रशासनाने माहिती दिली नसल्याचे नाईक यांनी सांगितले.

 

नाईक पुढे म्हणाले, संबंधित माहिती लेखा आणि वित्त विभागाशी संबंधित असल्याचे कारण सांगून पीएमआरडीए प्रशासनाने माहिती दडविण्याचे काम केले. पीएमआरडीए कडून विवेक खरवडकर यांना वाचविण्याचे काम केले जात आहे. याबाबत आपण राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.