Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा ‘मोका पॅटर्न’; 63 गुन्हेगारी टोळ्या तुरुंगात

एमपीसी न्यूज – शहराला लागलेली संघटीत गुन्हेगारीची कीड मुळासकट (Chinchwad)नष्ट करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी ‘मोका पॅटर्न’ प्रभवीपणे राबवला.

याचा परिपाक म्हणजे विनयकुमार चौबे यांनी शहराची धुरा सांभाळल्या पासून 63 गुन्हेगारी टोळ्या सध्या तुरुंगात आहेत. जे भुरटेगिरी करतात, त्यांच्याही मुसक्या आवळल्या जात आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून सर्वाधिक टोळ्यांवर सन 2023 मध्ये प्रभावी (Chinchwad)कारवाई झाली आहे. सन 2022 च्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक टोळ्या आणि त्यातील 357 सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर चालू वर्षात 12 गुन्हेगारी टोळ्यांमधील 58 गुन्हेगारांवर मोका लावण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात काम, नोकरी आणि शिक्षणासाठी आलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा लोकांमध्ये दहशत निर्माण करून परिसरात वर्चस्व निर्माण करायचे, अशी लक्षणे असलेल्या भुरट्या आणि स्वयंघोषित भाईना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांवर मोकासारख्या कायदेशीर कारवायांच्या माध्यमातून पोलिसांनी वचक निर्माण केला आहे.

Pune: तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा?-सुप्रिया सुळे

पोलीस आयुक्तालयाची सुरुवात 15 ऑगस्ट 2018 रोजी झाली. सुरुवातीला गुन्हेगारी टोळ्यांवर संथगतीने कारवाई झाली. मात्र या टोळ्यांच्या कुरापती वाढत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी मोका सारख्या प्रतिबंधात्मक कारवायांना सुरुवात केली. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 14 डिसेंबर 2022 रोजी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्येच खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा लाऊन गुन्हेगारांवर कारवाया करण्यास सुरुवात केली.

सन 2023 मध्ये वर्षभरात 51 टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळ्यांमध्ये 357 गुन्हेगार आहेत. ही कारवाई मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. त्यातच मागील वर्षभरात मावळ परिसरात गुन्हेगारीने डोके वर काढल्याने पोलिसांची तिकडच्याही गुन्हेगारांवर वक्रदृष्टी पडली. मावळ परिसरातील आठ टोळ्यांमधील 73 गुन्हेगारांना कारागृहात डांबले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोका अंतर्गत केलेली कारवाई –

वर्ष                               टोळ्या        गुन्हेगार
2018                             1                  7
2019                              9               59
2020                              9               50
2021                            26             187
2022                            18             129
2023                            51              357
2024 (4 मे पर्यंत)         12              58

चालू वर्षात मोका लावलेल्या टोळ्या

सुरज किरवले टोळी (पिंपरी) (4 आरोपी)
रोहित खताळ टोळी (वाकड) (12 आरोपी)
अमन पुजारी टोळी (निगडी) (3 आरोपी)
राहुल यादव टोळी (चिखली) (5 आरोपी)
पवन उजगरे टोळी (भोसरी) (3 आरोपी)
आदित्य उर्फ निरंजन अहिरराव टोळी (वाकड) (3 आरोपी)
निलेश रेनवा टोळी (चिखली) (4 आरोपी)
आदर्श उर्फ कुक्या जगताप (भोसरी) (3 आरोपी)
राहुल पवार टोळी (महाळुंगे एमआयडीसी) (5 आरोपी)
शाहरुख खान टोळी (5 आरोपी)
सुरज शिंदे टोळी (7 आरोपी)

प्रकाश उर्फ गणेश नामदेव श्रीगोंड टोळी (2 आरोपी)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.