Pune: तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा?-सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज -सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पुण्यातील(Pune) दौंडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली.या सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा? हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. बोलणार हवा असला तर आपली तुतारी वाजलीच पाहिजे.

माझ्यावर टीका करायला काही नाही म्हणून अशी टीका करतात. माझं चॅलेंज आहे की मी किती वेळा दौंडमध्ये आले आणि तुम्ही किती वेळा दौंडमध्ये आला आहात. याचा हिशोब काढा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

त्या पुढे म्हणाल्या, दौंडला मी महिन्यातून एकदा तरी येतेच. मी आभार मानते की तीन वेळेस मला संसदेत जायची संधी दिली आहे. माझं चिन्ह आता बदलल आहे. मी पक्ष नाही बदलला चिन्ह बद्दललं आहे.

आपण दौंडमध्ये एकत्रित काम केलं आहे. लोक माझ्यावर टीका करत आहेत. म्हणतात की भाषण करून विकास होत नाही. माझं म्हणणं आहे की भाषण करूनच विकास होतो . कारण ही लोकशाही आहे. तुमचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी मी भाषण करते.

Chinchwad : ‘मोका पॅटर्न’; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे मोका कारवाईचे अर्धशतक

त्या पुढे बोलतांना म्हणाल्या,आज दौंडमध्ये दमदाटी करत आहेत. पाणी बंद होईल म्हणून… धमक्या देतात. पाणी तुमच्या घरचं नाही. कॅनल तुमच्या घरचा नाही. हे पाणी माझ्या शेतकऱ्यांचा आहे. कुणीच माईका लाल दौंड आणि बारामतीचे पाणी बंद करतो ते बघते. तुमचा ऊस पण कुणी अडवणार नाही. कसं अडववतात ऊस तेच बघते. कुणीही उसामध्ये गडबड केली तर तुमच्यासाठी आंदोलन मी करेन माझा शब्द आहे.

रात्र वैऱ्याची आहे पुढील दोन चार दिवस काय होईल ते सांगता येत नाही. लक्ष असू द्या. सरस्वती लक्ष्मी अन्नपूर्णा सगळेच येतील. उद्या इथला प्रचार संपला की शिरूरला अमोल दादा ची तुतारी वाजवायला जायचं आहे… कोणीही आराम करू नका. आपल्याला भरपूर काम आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.