Chinchwad : एचडीएफसी कॉलनी ,शाहूनगर येथे एका सदनिकेस आग,सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही,लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज – चिंचवड मधील शाहूनगर परिसरात एका सदनिकेला आग (Chinchwad)लागली. यामध्ये सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना रविवारी (दि. 5) पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, पहाटे सव्वा पाच वाजता पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला (Chinchwad)वर्दी मिळाली की, शाहूनगर, चिंचवड येथील एचडीएफसी कॉलनी मध्ये दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेस आग लागली आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्र, चिखली आणि तळवडे उपकेंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून एका तासात आग विझवली.

Pune: तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा?-सुप्रिया सुळे

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र सदनिकेतील साहित्य जळाल्याने अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.