Dehuroad: देहूरोडमधील सराईत गुंड एम.पी.डी.ए.  कायद्यान्वये पिल्ले 1 वर्षासाठी स्थानबध्द

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहुरोड पोलीस स्टेशन (Dehuroad)हद्दीत गुन्हे करणारा सराईत गुंड आकाश अरमुगम पिल्ले (वय 24 वर्षे, रा. देहूरोड पुणे) याला स्थानबद्ध केले आहे.
पिल्ले याने स्वतःची टोळी बनवुन त्यामाध्यमातुन देहूरोड, किवळे परिसरात जबरी चोरी,(Dehuroad) दरोडा, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदेशिर जमाव जमविणे, गंभीर दुखपत करणे अशा स्वरूपाचे एकुण 15 गंभीर गुन्हे दाखल असुन यापुर्वी त्याची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून 1 वर्षाकरीता तडीपार केले होते.
तरीही सदर तडीपार कालावधी दरम्यान आकाश पिल्ले याने देहूरोड परिसरामध्ये बेकायदेशिररित्या प्रवेश करून गंभीर शरिराविरुध्दचे व मालाविरुध्दचे गुन्हे केल्याने देहूरोड परिसरामध्ये त्याची दहशत निर्माण झाली होती.
 त्याच्या कृत्यांमुळे सर्वसामन्य नागरिक त्यांच्या जिवीताचे व मालमत्तेच नुकसान होईल या भितीमुळे ते उघडपणे सदर सराईत गुंडाचे विरुध्द तक्रार देण्यास धजावत नव्हते.

या गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देहूरोड पोलीस स्टेशन विजय वाघमारे यांनी आकाश पिल्ले याचे विरोधात नियोजित स्थानबध्दतेचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयात सादर केला. सदर प्रस्तावाची गांभिर्याने दखल घेवून मा. पोलीस आयुक्त सो श्री. विनयकुमार चौबे यांनी सराईत गुंड आकाश पिल्ले यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये येरवडा कारागृह, पुणे येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश  दिले आहेत.
याबाबत गुरुवारी (दि.2)आदेश पारित केले आहे. सदर आदेशानुसार सराईत गुंड आकाश अरमुगम पिल्ले वय 24 वर्षे यास शुक्रवारी (दि.3) रोजी ताब्यात घेवुन येरवाडा कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक. विजय वाघमारे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार अनिल जगताप, धिरज अंभोरे, शुभम बावनगर, स्वप्नील साबळे व इतर यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.