Pune: राहुल गांधी यांच्या सभेने पुण्याचा माहोल काँग्रेसमय –  रवींद्र धंगेकर 

एमपीसी न्यूज – काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची काल (Pune)पुण्यात झालेली सभा ही पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी “गेम चेंजर” ठरली आहे. ‌ या सभेमुळे शहरातील सगळा माहोल काँग्रेसमय झाला असून ही सभा निवडणुकीच्या निकालावर विजयी शिक्का मोर्तब करणारी सभा ठरली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ. रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. 

धंगेकर म्हणाले की, राहुल गांधी यांच्या काल पुण्यात झालेल्या सभेला(Pune) उदंड प्रतिसाद मिळाला. सभेतील भाषणात राहुल गांधी यांनी सगळ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करून नेमकेपणाने भाष्य केले.

Baramti Loksabha Election :  बारामती लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी 7 मे रोजी कामगारांना भरपगारी सुट्टी

 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जी वचने देशातील जनतेला देण्यात आली आहेत त्याचाही विस्तृत ऊहापोह राहुल गांधी यांनी केला त्याचा उपस्थितांवर विधायक परिणाम झालेला दिसला. सर्व गरीब महिलांच्या खात्यावर महिना साडेआठ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला एक लाख रुपयाची थेट आर्थिक मदत, देशातल्या सर्वच पदवीधर आणि पदविका धारक युवकांना वार्षिक एक लाख रुपयांची अप्रेंटिसशिप योजना, मनरेगा कामगारांचा रोजगार दुप्पट करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि त्यांना किमान हमीभावाची कायदेशीर हमी देणार या जाहीरनाम्यातील घोषणा मतदारांवर अनुकूल परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत त्यावर राहुल गांधी यांनी सभेत जे विस्तृत भाष्य केले त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद काँग्रेसच्या पथ्यावरच पडणारा आहे असे धंगेकर म्हणाले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.