Loksabha election : हिंजवडी, वाकड परिसरातील 20 मतदान केंद्रांवर एक हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि. 7) रोजी मतदान होणार आहे. बारामती मतदारसंघाचे हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 मतदान केंद्रात एकूण 93 बूथ आहेत. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार (Loksabha election) आहे.

लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा तिसरा टप्पा 7 एप्रिल रोजी होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात राज्यभरात बहुचर्चित असलेल्या बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामती मतदारसंघातून नणंद(सुप्रिया सुळे)-भावजय(सुनेत्रा पवार) असा सामना होत आहे. एकाच परिवारातील दोन्ही उमेदवार असल्याने या निवडणुकीत प्रचंड रंगत आली आहे. दरम्यान प्रशासनाने ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शक्य ती सर्व खबरदारी घेतली आहे.

बारामती मतदारसंघातील 20 मतदान केंद्र आणि त्यातील 93 बूथ वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. या मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुमारे एक हजार पोलिसांचा फौजफाटा या केंद्रांवर तैनात असणार(Loksabha election) आहे.

Maval LokSabha Elections 2024 : मावळमध्ये 34 आदर्श मतदान केंद्र

यामध्ये एक पोलीस उपायुक्त, तीन सहायक आयुक्त, 90 अधिकारी (निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक) 722 कर्मचारी, 81 होमगार्ड, पाच विशेष सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची एक तुकडी असा तब्बल हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.