Baramati Loksabha Election : टपाली आणि मतदान कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच 85 वर्षावरील ज्येष्ठ,  दिव्यांग नागरिक  तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करून तेथे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी(Baramati Loksabha Election) यांनी जाहीर केले आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघात(Baramati Loksabha Election) 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 1 ते 3 मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) 1 ते 3 मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 4 ते 6 मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) 2 ते 4 मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 2 ते 6 मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 1 ते 2 मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) 1 ते 3 मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 4 ते 6 मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

पुरंदर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 2 व 3 मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) 1 ते 3 मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 4 ते 6 मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे. भोर विधानसभा मतदारसंघात 85  वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 2 ते 4 मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) 1 ते 2 मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 3 ते 6 मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.

LokSabha Elections 2024 :  निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर-डॉ. सुहास दिवसे

खडकवासला विधानसभा मतदारसंघात 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया 1 ते 2 मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) 2 ते 6 मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे,असेही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.