Pune : किरकोळ कारणावरून कारागृहात कैद्याकडून हवालदाराला मारहाण

एमपीसी न्यूज –  दगड लागेल अशी सूचना केली या किरकोळ ( Pune) कारणावरून येरवडा कारागृहात कैद्यांनी हवालदाराला बेदम मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि.5) घडली.

 नानासाहेब रामचंद्र मारणे (वय 57) असे जखमी झालेल्या हवालदाराचे नाव आहे.याबाबत मारणे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिलीआहे. त्यावरून अपूर्व संजय खंडागळे, सूरज नारायण अडागळे,आनंद ऊर्फ सोनू सिद्धेश्वर धड आणि नीरज लक्ष्मण ढवळे या कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सी. जे. विभागात दगडी भिंत पाडून नवीन बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

मारणे रविवारी  (दि.5)सकाळी गस्तीवर होते. त्यावेळी तेथील कैद्यांना भिंतीचा दगड लागल्यास इजा होईल, असे सांगितले.

कैद्यांनी मारणे यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने डोक्यात, हातावर मारहाण केली. त्यात मारणे यांच्या मनगटाचे हाड फॅक्चर झाले. याबाबत मारणे यांनी सोमवारी तक्रार दिल्यानंतर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे करत ( Pune)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.