Pune : गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला

एमपीसी न्यूज –  गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर ( Pune) कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.   पुण्यातील कोंढवा भागात  ही घटना घडली. 

याप्रकरणी धर्मेंद्र गुप्ता यांनी  कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली  असून  3 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Nagpur Earthquake : नागपूरमध्ये सहा दिवसात चौथा भूकंपाचा धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते. अचानक 3 व्यक्तींनी गैरसमजातून फिर्यादी यांच्या दुकानाजवळ येऊन, फिर्यादी यांचे टपरीवरील सामान खाली फेकुन दिले . तसेच नुकसान करुन त्यातील एकाने त्यांच्या जवळील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार केले.  याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तात्काळ या तिन्ही आरोपींना अटक केली . या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज आता ( Pune) समोर  आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.