PCMC : ‘किलकारी’ योजनेंतर्गत शहरातील 232 गर्भवती महिलांची नोंदणी

एमपीसी न्यूज –   महाराष्ट्र शासनाने गर्भवती माता व बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी ( PCMC) सुरू केलेल्या किलकारी योजनेंतर्गत शहरातील 232 गर्भवती महिलांनी नोंदणी केली आहे. या योजनेमध्ये नोंदणी केल्यानंतर गर्भवती महिलांना एसएमएस व व्हॉइस नोटद्वारे आरोग्य विषयक माहिती मिळणार आहे. एक एप्रिलपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या गर्भवती महिलांना आपल्या आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत नोंदणी करण्यासाठी गर्भवती मातेने जवळील सार्वजनिक आरोग्य केंद्रावर आरसीएच पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.

या पोर्टलवर नोंदणी केलेल्या गर्भवतींना गर्भारपणातील घ्यायच्या काळजीपासून ते बाळंतपणातील ( PCMC) काळजी, बाळाचे लसीकरण याविषयीच्या माहितीचे संदेश एसएमएसद्वारे किंवा व्हॉटस्प व्हाइस रेकॉर्डिंगद्वारे मिळू शकणार आहे. तसेच या नोंदणीकृत महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभही घेता येणार आहे. सर्वसामान्य व गरीब वर्गातील गर्भवती व जन्मलेल्या बालकांचे आरोग्य चांगले रहावे या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Pune : किरकोळ कारणावरून कारागृहात कैद्याकडून हवालदाराला मारहाण

सर्व महापालिका दवाखाने व रुग्णालयांत किलकारी योजनेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नाव नोंदणीसाठी महापालिकेच्या आशा सेविका व आरोग्य कर्मचारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. नोंदणीकृत गर्भवती महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देखील मिळणार आहे.

गर्भवतींनी पहिल्या तिमाहीत नोंदणी केल्यास तब्बल 72 व्हॉइस मेसेज व एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार आहे. नोंदणी केल्यानंतर महिलांना गर्भारपणातील विविध टप्प्यांत करायच्या वैद्यकीय चाचण्यांची माहिती दिली जाणार आहे. तसेच गर्भवती महिलेने कोणता आहार घ्यावा, प्रसूतीची तारीख जवळ आल्यानंतर घ्यायची काळजी, बाळंतपणात स्वतःची व नवजात बालकाची काळजी कशी घ्यावी, पहिल्या वर्षातील बाळाचे लसीकरण, सहा महिन्यांनंतर बाळाला द्यायचा आहार या विषयी माहिती मिळणार आहे, अशी माहिती वैद्यकीय ( PCMC) विभागाने दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.