Pune : गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला
एमपीसी न्यूज – गैरसमजातून पुण्यात एका व्यक्तीवर ( Pune) कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील कोंढवा भागात ही घटना घडली.
याप्रकरणी धर्मेंद्र गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 3 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Nagpur Earthquake : नागपूरमध्ये सहा दिवसात चौथा भूकंपाचा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते. अचानक 3 व्यक्तींनी गैरसमजातून फिर्यादी यांच्या दुकानाजवळ येऊन, फिर्यादी यांचे टपरीवरील सामान खाली फेकुन दिले . तसेच नुकसान करुन त्यातील एकाने त्यांच्या जवळील कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तात्काळ या तिन्ही आरोपींना अटक केली . या घटनेचे सी सी टिव्ही फुटेज आता ( Pune) समोर आले.