Dehugaon : गाथा मंदिर इंद्रायणी घाटावर एकजण बुडाला

एमपीसी न्यूज – देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ असलेल्या इंद्रायणी घाटावर एक (Dehugaon)व्यक्ती बुडाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी घडली.बुडालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्या व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्ष आहे.

याबाबत माहिती अशी की, गाथा मंदिराजवळ असलेला इंद्रायणी घाटावर गुरुवारी (Dehugaon)दुपारी अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्ती बुडाला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या सदस्यांना पाचारण केले.

Pimpri-Chinchwad : आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेत शास्त्रीय नृत्याने घातली रसिकांच्या मनावर मोहिनी

सदस्यांनी बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. बुडालेल्या व्यक्तीच्या हातावर अशोक रामकिसन लाहुरे असे गोंदलेले आहे. बुडालेले व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेचे निलेश गराडे, भास्कर माळी, अविनाश कार्ले, वैभव वाघ, संतोष दहीभाते, अनिल आंद्रे, अनिश गराडे यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.