Pimpri-Chinchwad : आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेत शास्त्रीय नृत्याने घातली रसिकांच्या मनावर मोहिनी

एमपीसी न्यूज –  डाॅ. डी.वाय.पाटील विद्यापीठ स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स च्या वतीने नुकतीच आंतरराष्ट्रीय नृत्य परिषद व नृत्य महोत्सव मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरीयम मध्ये आयोजित करण्यात आला.या नृत्य परिषदेत शिकागो, बंगलोर, आसाम, कलकत्ता, मुंबई, सोलापूर, पुणे इ. ठिकाणांहून 35 कलाकार(Pimpri-Chinchwad) आले होते. 

 

या कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती  डाॅ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर डाॅ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे  कुलगुरु डाॅ.एन.जे.पवार, डाॅ.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे  संचालक व प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर कपोते, नृत्य गुरू डाॅ.स्वाती दैठणकर उपस्थित होते.

 

प्रारंभी डाॅ.पं.नंदकिशोर कपोते व डाॅ. स्वाती दैठणकर यांनी कथक व भरतनाट्यम नृत्याची अप्रतिम जुगलबंदी व एकत्र गणेश वंदना सादर करून रसिकांवर मोहिनी घातली.

 

यानंतर स्वाती दैठणकर यांनी सुंदर एक श्लोकी रामायण सादर केले तर डाॅ.नंदकिशोर कपोते यांनी ठुमक चलत रामचंद्र हे भजन व ‘अवधमे आयो राम’ हे गीत सादर केले.यास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डाॅ.कपोते यांनी तबला व घुंघरूची जुगलबंदी सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

 

डाॅ.भाग्यश्री पाटील यांच्या भरतनाट्यम नृत्याची अप्रतिम चित्रफीत दाखविण्यात आली.यानंतर,भारतातील विविध ठिकाणांहून परिषदेत भाग घेण्यासाठी आलेल्या कलाकारांनी रिसर्च पेपर वाचून विविध नृत्य प्रकार सादर केले. यात कुचीपुडी, मोहीनीअटटम, सत्रिय, ओडिसी, भरतनाट्यम, कथक या शास्त्रीय नृत्य शैलींचा समावेश(Pimpri-Chinchwad) होता. भारतातील विविध ठिकाणांहून आलेल्या सर्व नृत्य गुरूंचा सत्कार प्र-कुलपती डाॅ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम रंगतदार झाला.

Talegaon Dabhade :कलापिनी हास्य योगाचे 21 व्या वर्षात पदार्पण. रंगतदार कार्यक्रमाने रंगला 20 वा वर्धापन दिन !

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.