Vadgaon : सोपानराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त, वडगावचे माजी सरपंच सोपानराव बाबुराव म्हाळसकर यांच्या स्मरणार्थ रविवारी (दि. 28) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत कै. बाबुराव श्रीपती म्हाळसकर नगर, माय कार शोरुम शेजारी, वडगाव फाटा येथे होणार आहे. प्रत्येक रक्तदात्यास(Vadgaon) हेल्मेट भेट देण्यात येणार आहे.

 

तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त,वडगांवचे मा.सरपंच  वै.सोपानराव बाबुराव म्हाळसकर (आण्णा ) (वय 82)यांचे रविवार(दि.21) रोजी अल्पशा आजाराने(Vadgaon) निधन झाले.कै.आण्णांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली आणि एक समाजोपयोगी उपक्रम म्हणून उद्या रविवार (दि.28)  रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

Nigdi Blood Donate Camp

या रक्तदान शिबिरामध्ये म्हाळसकर परिवारातील 82 जण रक्तदान करणार आहेत. परिवाराचे सर्व नातेवाईक आणि मित्र परिवार यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे आणि या पवित्र कार्यात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे.

 

रक्तदान शिबीर कै. बाबुराव श्रीपती म्हाळसकर नगर, माय कार शोरुम शेजारी, वडगांव फाटा या ठिकाणी घेण्यात येणार असून म्हाळसकर परिवारातर्फे प्रत्येक रक्तदात्यास सुरक्षिततेसाठी हेल्मेट भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. या स्तुतीपर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी किंवा शिबिरासंबंधी अधिक माहिती घेण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात आले आहे.
संतोष –  9850540480
निलेश – 9822794680
संदीप – 9922348148
चंद्रशेखर – 9822264027
अतुल – 9552968009

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.