Talegaon Dabhade : रोटरी सिटीतर्फे रक्तदान शिबिर; 72 पिशव्यांचे रक्त संकलन

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उर्से येथे पिंपरी चिंचवड ब्लड बँक सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर घेण्यात आले. रविवारी (दि. 16) सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत झालेल्या या शिबिरात 72 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे (Talegaon Dabhade) सिटी व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उर्से येथे पिंपरी चिंचवड ब्लड बँक सेंटर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रात सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे हे जाणून या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून हा स्तूत्य उपक्रम घेण्यात आला.रविवार १६ जुलै 2023 रोजी सकाळी ९ते ३ या वेळेत ७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून ७२ बाॅटल रक्त रक्तपेढीला सुपुर्त करण्यात आले.
रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे, चार्टर्ड प्रेसिडेंट विलास काळोखे, सेक्रेटरी भगवान शिंदे,प्रकल्प प्रमुख हर्षल पंडित,संजय मेहता,संतोष शेळके,संजय वाघमारे,तानाजी मराठे यांच्या हस्ते रक्तदान करणारास प्रत्येकाला हेल्मेट देण्यात आली तर सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांना रोटरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख रो.हर्षल पंडीत यांनी केले तर अध्यक्ष सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, संजय मेहता, संतोष शेळके‌ यांनी शुभेच्छा दिल्या आभार सेक्रेटरी भगवान शिंदे यांनी मानले.

https://youtu.be/4QfUc2ZT8fw

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.