Talegaon Dabhade : ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये रोटरीच्या वतीने शाळा सुधार विकास प्रकल्प

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ॲड्. पु. वा. परांजपे विद्या मंदिर या शाळेत रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने ( Talegaon Dabhade ) शाळा सुधार विकास प्रकल्प राबवला जात आहे. रोटरीच्या माध्यमातून सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सीएसआर फंडातून शाळेत मुलींचे शौचालय उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 27) करण्यात आले. तसेच यावेळी इतर कामांचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला.

मुलींचे स्वच्छतागृह व कोनशिला अनावरण समारंभास परदेशी पाहुणे कॅरेन असदोरियन व्ही.पी, गिर्बिट रोक्स टर्बोंनसन मानव संसाधन संचालक,सतीश बोरोळे संचालक व्यवसाय प्रमुख,योगेश पवार प्रमुख इंडिया टेक सेंटर,चैतन्य कुलकर्णी व्यवस्थापक,अपर्णा दिवेकर एच् आर मॅनेजर इंडिया,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे उपाध्यक्ष कमलेश कार्ले व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे  सचिव संतोष खांडगे, सहसचिव व ॲड्.पु.वा.परांजपे विद्यामंदिर शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के,ज्येष्ठ संचालक यादवेंद्र खळदे, रो.श्रीशैल मेंथे,अशोक काळोखे, विश्वनाथ मराठे,महेश महाजन,राजेंद्र पोळ,जयंत देशपांडे,मंगेश गारोळे, राजू गोडबोले,देवेंद्र कदम,प्रभाकर निकम,अतुल हंपे,प्रमोद दाभाडे, अविनाश धेंडे,निलेश वाकचौडे,अरुण सोनवणे,चेतन नामजोशी,धनंजय माथुरे,आनंद असवले उपस्थित होते.संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक व शाळेतील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित ( Talegaon Dabhade ) होते.

Today’s Horoscope 30 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मुलींच्या स्वच्छतागृहाचे उद्घाटन, कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड् .पु.वा.परांजपे विद्या मंदिराचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. कॅरेन असदोरियन यांनी आपल्या मनोगतातून शालेय परिसर,स्वच्छता,भारतीय संस्कृती व येथील शैक्षणिक वातावरण पाहून आनंदित झाल्याचे नमूद केले. सर्व प्रमुख पाहुण्यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा ऐतिहासिक वारसा समजून घेऊन संस्थेची प्रशंसा केली.

कमलेश कार्ले  यांनी आपल्या मनोगतातून रोटरी क्लब करत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली भविष्यात देखील मुलांचे स्वच्छतागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणातून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष उद्धव चितळे यांच्या प्रयत्नातून शाळेसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक कौतुक ( Talegaon Dabhade ) करून विद्यार्थ्यांच्या भौतिक सोयी सुविधांसाठी अशाच प्रकारचे सहकार्य नेहमीच लाभत असते असे आवर्जून नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा काळडोके यांनी तर आभार  प्रशालेच्या पर्यवेक्षिका कमल ढमढेरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.