Today’s Horoscope 30 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 30 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 30.04.2024.

शुभाशुभ विचार – क्षयतिथी.

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 03.00  ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – उत्तराशाढा.

चंद्र राशी – धनु 10.37 पर्यंत नंतर मकर.

—————————–

मेष ( शुभ रंग- सोनेरी)

व्यावसायिक आपली टार्गेट पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतील. नोकरदारांना वरिष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. मित्र आज तुम्हाला खोटी आश्वासने देतील.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड भरावा लागेल. काही घरगुती समस्या वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)

तुमच्या कार्यक्षेत्रात नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकते. मोठे आर्थिक व्यवहार आज जपून केलेले बरे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण असायलाच हवे.

कर्क ( शुभ रंग- चंदेरी)

वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन या कारणाने कार्यक्षेत्रात यशाची कमान चढती राहील. आज वैवाहिक जीवनातही सुसंवाद असेल. गृहसौख्य लाभेल.

सिंह ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. जेष्ठांना काही आरोग्याच्या तक्रारी हैराण करतील. आज दुकानदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)

उच्चशिक्षित तरुणांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नव्या विषयात गोडी निर्माण होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आज मुलांचे लाड पुरवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

तूळ (शुभ रंग- जांभळा)

आज घरगुती व्यवसाय तेजीत चालतील. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येईल. व त्यांना घराजवळच एखादा रोजगार मिळू शकेल. प्रेम प्रकरणे मात्र मनस्ताप देतील.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)

एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाईल. प्रतिष्ठांमधील तुमची उठबस व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने कामी येईल. वादविवाद टाळा.

धनु (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. वाणित गोडवा ठेवाल तर अनेक बिकट प्रश्न सहज मार्गी लागतील.

मकर (शुभ रंग- क्रीम)

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असून सर्व कामे सुरळीत पार पडतील. गृहसौख्य लाभेल. आज तुम्ही जोडीदाराला एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल.

कुंभ ( शुभ रंग- मोतिया)

आज जरा स्वतःच्या स्वार्थाकडे लक्ष द्या. परमार्थाचा अतिरेक नको. केवळ मोठेपणासाठी न परवडणारा खर्च करू नका. जेष्ठांनी हाती असलेली पुंजी जपून वापरायला हवी.

मीन ( शुभ रंग- पांढरा)

व्यावसायिकांची आवक वाढेल. पैशा अभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील. मुलांचे विवाह योग जुळून येतील. आप्तस्वकीय तुमच्या शब्दाला मान देतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.