PCMC : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत ‘आपण सारे अर्जुन!’ ही बौद्धिक कार्यशाळा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जात असले तरी येथे बौद्धिक उपक्रम तुलनेने कमी प्रमाणात होतात.या पार्श्वभूमीवर किमया कम्युनिकेशन्स या संस्थेमार्फत ‘आपण सारे अर्जुन! या विषयावर घेण्यात आलेली कार्यशाळा लक्षवेधी ठरली. पेशाने ब्रँड कन्सल्टंट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रा.जयंत शिंदे यांनी ही कार्यशाळा घेतली.

 

‘आपण सारे अर्जुन!’ या विषयाची मांडणी करताना प्रा.जयंत शिंदे म्हणतात,’जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्याला विविध भूमिका पार पाडाव्या लागतात.मात्र,अशा भूमिका पार पाडताना आपली मनोभूमिका महत्त्वाची असते.ती तयार करण्यासाठी स्वसंभाषण बरोबरच,योग्य व्यक्तीबरोबर क्लास कम्युनिकेशन होणे आवश्यक असते.यासाठी ते महाभारतातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा दाखला देतात.’केवळ राज्य मिळविण्यासाठी आपल्याच माणसांशी युद्ध करण्यात काय अर्थ आहे?’अर्जुनाला पडलेल्या या प्रश्नावर श्रीकृष्ण म्हणतो,’अर्जुना,युद्ध केवळ भूमीसाठी लढले जात नाही ,तर भूमिकेसाठी लढावे लागते! ‘कौरवांकडून पांडवांवर झालेल्या अन्यायाविरोधात तुला लढावेच लागेल!’श्रीकृष्ण ,अर्जुनाची भूमिका तयार करतो. श्रीकृष्णच्या म्हणण्याप्रमाणे अर्जुन भूमिका घेतो आणि पांडव महाभारतातील युद्ध जिंकतात. तसेच,यावर प्रा.जयंत शिंदे भाष्य करतात की, ‘ अर्ध युद्ध मनात जिंकले जाते आणि राहिलेलं  थेट रणांगणात जिंकले जाते.’

 

‘महाभारतातील अर्जुनाचा दाखला देत,प्रा.शिंदे म्हणतात,एका अर्थाने आपण सर्वजण अर्जुनच आहोत! आपण भूमिका घेऊन ती यशस्वीरीत्या पार पाडली पाहिजे.ब्रँड कन्सल्टंट म्हणून घेत असलेल्या पर्सनल सेशन्सचे विस्तारीत रूप म्हणजे ‘आपण सारे अर्जुन’ ही कार्यशाळा.या अभिनव कार्यशाळेत विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

 

या कार्यशाळेसाठी माधव पाटील व प्रमोदिनी लांडगे यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पाटील यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी या बौद्धिक उपक्रमाचे स्वागत केले आणि अशा कार्यशाळा घेण्यासाठी विविध संस्थांनी पुढे यावे,असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.