ACB: महावितरणच्या सहायक अभियंत्याला 45 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – महावितरणच्या भोसरी कार्यालयातील सहायक अभियंत्याला 45 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 30) करण्यात(ACB) आली.

किरण गजेंद्र मोरे (वय 33) असे अटक केलेल्या सहायक अभियंत्याचे (वर्ग-2) नाव आहे. याप्रकरणी 47 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे फ्रेंड इलेक्ट्रोनिक्स कंपनीचे सर्व कामकाज पाहतात. कंपनीला सन राईस कंपनीचे विद्युत भार वाढविण्याचे काम मिळाले होते. विद्युत भार वाढविण्यासाठी तक्रारदार यांनी महावितरणच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यासाठी अर्ज किरण मोरे यांच्याकडे(ACB) आला होता.

Wakad : मनी लॉन्ड्रींगची भीती घालून आयटी अभियंत्याला 12 लाखांचा ऑनलाईन गंडा

हे काम करून देण्यासाठी त्यांनी 50 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने मंगळवारी सापळा लावला. तडजोड करून किरण मोरे याने 45 हजारांची लाच घेतली. लाच घेताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.