ACB News : दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तलाठ्यास अटक

एमपीसी न्यूज – मयत महिलेचे नाव सात बारा(ACB News )उताऱ्यावरून कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील चांबळीच्या तलाठ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 3) करण्यात आली आहे.

तलाठी नीलम मानसिंग देशमुख (वय 32), नारायण दत्तात्रय शेंडकर (वय 50) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नीलम देशमुख या चांबळी सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या आईचे जानेवारी 2023 मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी चांबळी तलाठी कार्यालयात अर्ज केला.

ACB News : पोलीस ठाण्यातील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिसाने मागितली 25हजारांची लाच

सात बारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी तलाठी कार्यालयात त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागणी करण्यात आली. त्याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली.

एसीबीने सोमवारी या तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये तलाठी नीलम देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागितली. तसेच देशमुख यांचे मदतनीस नारायण शेंडकर यांनी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली.

लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडून दोघांना ताब्यात घेतले. एसीबी पुणे येथील (ACB News ) पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.