Pune News : खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

एमपीसी न्यूज – सासवड येथील एका कॉलेज चालकाला (Pune News) तीन लाखांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. हि कारवाई शनिवारी (दि.18) सासवड येथे करण्यात आली आहे.
अक्षय सुभाष मारणे (वय 29) व गणेश बबनराव जगताप (वय 40) अशी अटक आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली की, आरोपींनी ते माहिती अधिकारकार्यकर्ते असून त्यांनी फिर्यादीला ब्लॅकमेल करत 3 लाख रुपयांची खंडणी मागितली. यावरून 13 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार करण्यात आली होती.(Pune News) त्यानुसार पोलिसांना सापळा रचून आरोपीला शनिवारी (दि.18) अटक केली आहे.सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे पुढील तपास करत आहेत.