Pimpri : महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांच्या तपासणीची मागणी

एमपीसी न्यूज –  महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी करून कडक कारवाई करण्याची मागणी शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतिश कांबळे यांनी केली (Pimpri) आहे.

याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतिश कांबळे यांनीनिवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची(Pimpri) तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी रुग्णालयात आरोग्य योजनेत उपचार होताना रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक प्रकारे समस्यांना सामोरे जावे लागत आहे. योजनेचे अधिकारी व रुग्णालयांची संगनमत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असताना दिसत येत असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना सोसावा लागत आहे.

PCMC : महापालिकेच्या शाळेला 1 कोटी 88 लाखांचा निधी मिळणार

नोंदणीकृत रुग्णालयांचे बाह्यरुग्ण नोंदणी, रुग्ण दाखल नोंदणी, उपचार प्रमाणपत्रे ,डिस्चार्ज रिपोर्ट व रुग्णाशी संबंधित आदी रिपोर्ट तपासले पाहिजेत. आरोग्य सेवकांपासून ते यंत्रणातील सगळ्यांना या योजनेबाबत उद्धोधित करावे.

गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ न मिळवून देण्याकरिता योजना राबविणारे अधिकारी वर्ग आणि रुग्णालये यांची खूप मोठी साखळी अदृश्यपणाने प्रयत्न करत आहेत. खाजगी रुग्णालय अशा प्रकारे फसवणूक करून ह्या उत्पन्नाची मलई लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप डॉ. कांबळे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.