Loksabha Election : उरण, कर्जत, खालापूर, खोपोली भागात महायुतीचे उमेदवार बारणे यांची प्रचारफेरी

एमपीसी न्यूज – “मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी दि.(4 मे) रोजी उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. रात्री खोपोली शहरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीलाही उत्स्फूर्त(Loksabha Election) प्रतिसाद मिळाला”.

कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, उरणचे आमदार महेश बालदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय म्हसुरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

खासदार बारणे यांनी उरण खालापूर विधानसभेतील वावर्ले, बोरगाव, कोयना, भिलवले, वेणेगाव, कलोते, चौक फाटा, चौक शहर, तुपगाव, लोहोप, माझगाव, वाणीवली, तळवळी, मोहपाडा आदी गावांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

खोपोली शहरात संध्याकाळी प्रचारफेरी व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात झाली.‌ बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. शहराच्या विविध भागांमध्ये फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांचे स्वागत करण्यात आले. खोपोली व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित सभेत बारणे(Loksabha Election) यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.