PCMC : महापालिकेच्या शाळेला 1 कोटी 88 लाखांचा निधी मिळणार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीकडून पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेंतर्गत ( PCMC ) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाली आहे. शाळेला या माध्यमातून 1 कोटी 88 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेंतर्गत, दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 15 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकास केला जाणार आहे. या शाळांमध्ये ‘आयसीटी लॅब’, ‘डिजिटल लायब्ररी’, ‘स्मार्ट क्लासरूम्स’ तयार करण्यात येणार आहेत.

Lonavala : केंद्र व राज्य शासनामार्फत केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा – खासदार बारणे

तसेच विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत. पीएमश्री शाळा योजनेंतर्गत थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, सहायक आयुक्त विजय कुमार थोरात, शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

शाळेमध्ये अधिकाधिक प्रायोगिक आणि एकात्मिक पद्धतीने  इनडोअर व आउटडोअर उपक्रम शिकवले जाणार आहेत. शाळांमध्ये ‘डिस्कव्हरी ओरिएंटेड’ आणि ‘लर्निंग सेंट्रिक टीचिंग मेथड’ राबविण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी ( PCMC ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.