Maval : श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मावळमध्ये भाजपचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार

भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान ( Maval)  होणार आहे. प्रचारासाठी शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचार मोहीम हाती घेतली असल्याची माहिती भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भाजपने मावळ तालुक्यात आघाडी घेतली आहे. बारणे यांच्या प्रचारासाठी मावळ विधानसभा मतदार संघातील सर्व 381 बूथवर भारतीय जनता पार्टी व महायुती कडून ‘डोअर टू डोअर’ प्रचार करून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची सभा

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (दि. 6) जाहीर सभा होणार आहे. ही सभा कापसे लॉन्स, रहाटणी येथे सोमवारी दुपारी दोन वाजता होणार आहे. मावळ विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या प्रचार सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन देखील रविंद्र भेगडे यांनी ( Maval)  केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.