Nigdi : पोलीस अंमलदाराचा हृदयविकाराने मृत्यू

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला हृदविकाराचा ( Nigdi) त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निगडी येथे रविवारी (दि. 5) ही घटना घडली.  

 

बाळासाहेब महालींग नंदुर्गे (वय 38) असे मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Pune : पिरंगुट पुणे रोडवर वऱ्हाडाच्या बसला आग

 

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. पोलीस नाईक नंदुर्गे हे निगडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ते शनिवारी (दि. 4) रात्री नऊच्या सुमारास कामावर गेले. ‘डायल 112’ हेल्पलाइनवर ते कर्तव्य बजावत होते. दरम्यान, रविवारी (दि. 5) सकाळी सहाच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी निगडी येथील रुग्णालयात दाखल केले.

 

त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

 

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

 

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. नंदुर्गे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे करंजी या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार ( Nigdi) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.