Pune : पिरंगुट पुणे रोडवर वऱ्हाडाच्या बसला आग

एमपीसी न्यूज – पिरंगुट येथून पुण्याकडे जाणारी बस इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने ( Pune) अचानक पेटली. ही बस लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना रविवारी (दि. 5) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.

Today’s Horoscope 06 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

याबाबत माहिती अशी की, एक स्कूल बस (एमएच 12/ एसबी 3537) पिरंगुट येथून पुण्याकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होती. मार्गात म्हसोबा मंदिराजवळ घाटात आल्यानंतर स्कूलबस मधील इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. बसला अचानक लागलेल्या आगीमुळे बसमधील वऱ्हाडी मंडळींची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी बस मधून खाली उतरले.

त्यानंतर अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. कोथरूड अग्निशमन दलाच्या जवानांनी बसला लागलेली आग विझवली. या आगीमध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर वऱ्हाडी मंडळींची इतर वाहनातून घरी जाण्याची व्यवस्था करण्यात ( Pune) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.