Today’s Horoscope 06 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 06 May 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – सोमवार.

तारीख -06.05.2024.

शुभाशुभ विचार – त्रयोदशी वर्ज्य दिवस.

आज विशेष – शिवरात्री.

राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – रेवती 17.43 पर्यंत नंतर अश्विनी.

चंद्र राशी – मीन.

—————————–

मेष ( शुभ रंग- राखाडी)

आजचा दिवस खर्चाचा आहे. आज काटकर करणे शक्य नाही. मनसोक्त खर्च कराल. जेष्ठांची अध्यात्माकडे रुची राहील. तरुणांच्यात विलासी वृत्ती वाढेल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

आजचा तुमचा कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. आज तुमच्यासाठी यशदायी दिवस असून एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आज उत्तम दिवस आहे.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)

नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे दडपण राहील. आज बिनचूक कामास प्राधान्य द्यावे. व्यावसायिक मंडळी वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असतील.

कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) 

सरकार दरबारी असलेली कामे रखडतील. श्रद्धाळू गृहिणींचा देवधर्म चालूच राहील. अध्यात्मिक मार्गात असलेल्या मंडळींना एखादी दिव्य प्रचिती येईल.

सिंह ( शुभ रंग- केशरी)

मोठे आर्थिक व्यवहार आज टाळावेत. शारीरिक कष्टाची कामे करणाऱ्या कामगारांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी. घरात जोडीदाराच्या मताला प्राधान्य देणे हिताचे राहील.

कन्या (शुभ रंग- मोतिया )

आज तुमचे मनोबल उत्तम असल्याने तुम्ही कार्यक्षेत्रातील आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्या प्रभावात राहील. घरात जोडीदाराच्या कलाने घ्या.

तूळ (शुभ रंग- भगवा)

कार्यक्षेत्रात अथक परिश्रमांच्या साहाय्यानेच प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. आज कोणालाच काही सल्ले न देता फक्त स्वार्थ साधून घेण्यास प्राधान्य देणे हिताचे असेल.

वृश्चिक ( शुभ रंग- लाल) 

आज अत्यंत उत्साहाने दिवसाची सुरुवात कराल. सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन विषय शिकून घेण्याकडे आज तुमचा कल असेल.

धनु (शुभ रंग- पांढरा)

आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्यायचा तुम्ही प्रयत्न कराल. मुलांची अभ्यासातील प्रगती समाधानकारक राहील. कलेच्या क्षेत्रातील नवोदित मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

मकर (शुभ रंग- मकर)

आज घाई गर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांच्या नादी लागून जे पटत नाही ते करायला जाऊ नका. प्रवासात आज नवे हितसंबंध जुळून येतील.

कुंभ ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमच्या खिशात पैसा खेळता राहील. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. काही नाती जपायची असतील तर आज जरा अति स्पष्ट वक्तेपणाला आवर घाला.

मीन ( शुभ रंग- डाळिंबी)

आज काही अनुकूल घटना तुमच्या कामातील उत्साह वाढवतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्ही इतरांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्थी कराल.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.