PCMC : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे जाहीर मतदान करण्याचे आवाहन

"सर्व पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार, सभासद, कर्मचारी वर्ग यांनी प्रतिज्ञा घेऊन मतदान करावे"

एमपीसी न्यूज : “पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार, सभासद, कर्मचारी वर्ग यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेतर्फे आपल्या सर्व कामगार, ऑफिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय तसेच आपल्या कुटुंबातील मतदारांसाठी खालील प्रतिज्ञा घेऊन निस्वार्थपणे मतदानाचा हक्क बजावण्यास तयार करावे जेणे करून भारताची लोकशाही बळकट होण्यास मदत होईल” असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप बेलसरे(PCMC) यांनी केले आहे.

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म,वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. ”

वरील प्रतिज्ञा आपल्या कामगार,ऑफिस कर्मचारी यांचे कुटुंबातील मतदार तसेच आपल्या कुटुंबातील मतदार यांचेबरोबर प्रतिज्ञा घ्यावी व मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून मतदान करून घ्यावे व प्रतिज्ञा घेतलेले व मतदान केलेले फोटो संघटनेकडे पाठवावेत,असे आवाहन पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री.संदीप बेलसरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.