Pimpri : नदीप्रदूषण करणाऱ्या 4 वाहनांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज – थेरगाव आणि किवळे या भागांतून दररोज ट्रक, हायवा, ट्रैक्टर, डंपर, (Pimpri )टेम्पो- 407, आर.एम.सी. प्लॅन्टची मिक्सर वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकत असल्याने नदीप्रदुषण होत असल्याची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली आणि सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर दिनांक 24 आणि 25 एप्रिल 2024 रोजी कायदेशीर कारवाई केली. या कारवाईमध्ये 1 लाख रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे.

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या (Pimpri )मार्गदर्शनाखाली ज्युनियर इंजिनियर स्वप्निल पाटील, केमिस्ट पुष्पराज भागवत यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक तसेच एमएसएफ आणि मेस्को जवानांचे पथक यांची मदत घेवून ही कारवाई करण्यात आली.

 

Maval LokSabha Elections 2024 : आठवेळा संसदरत्न, दोनवेळा महासंसद रत्न अन् आता ‘ती’ खंतही दूर…!

महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये नदीपात्रात भराव टाकणारी 4 वाहने पकडून प्रत्येकी 25 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही नदीपात्रात भराव टाकणाऱ्या किंवा नदीप्रदूषण आणि वायूप्रदूषण करणाऱ्यांवर अशी कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली आहे.

शहरातील नद्या किंवा नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास यापूढेही फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल याची नोंद सबंधितांनी घ्यावी. शहरातील वातावरण पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांनीही यामध्ये महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.