Alandi : “महावीर की रोटी” या उपक्रमाचा आळंदी येथे शुभारंभ

एमपीसी न्यूज : आज (दि.5 मे) रोजी स्व. कांतीलालजी नंदरामजी चोरडिया यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ व सतीशजी कांतीलालजी चोरडिया व परिवाराच्या वतीने रक्तदान, अन्नदान व नेत्रदान (फॉर्म भरून घेणे )याचे आयोजन करण्यात आले होते.

 

वाणीभूषण प्रशांतऋषीजी म. यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या” महावीर की रोटी” या उपक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले. त्याप्रसंगी महाराजांनी प्रवचनामध्ये ज्ञानाचे महत्व धर्मात व धर्मग्रंथात सांगितलेल्या अनेक श्र्लोकांचे दाखले देत(Alandi) विशद केले .

 

ते पुढे म्हणाले, “जीवनात सन्मार्गांनी कमावलेले धन-संपत्ती ही अन्नदानासारख्या समाज उपयोगी उपक्रमात वापरली तर ती कधीही नाश पावत नाही उलट त्यात दिवसेंदिवस वाढच होत असते तसेच आपण केलेले रक्तदान हे सुद्धा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणारे ठरते व मरणोत्तर केलेले नेत्रदान एखाद्याच्या अंधकारमय जीवनात प्रकाश देणारे ठरते व पर्यायाने दानात सर्वात मोठे असलेले(Alandi) अभयदान होते”.
             

 

सतीश चोरडिया व परिवाराचे कौतुक करताना ते म्हणाले की, स्व. कांतीलालजी चोरडीयांच्या जन्म तिथीचे औचित्य साधून आज अन्नदान, रक्तदान व नेत्रदान या उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या समाजसेवेचा वारसा या परिवाराने पुढे चालू ठेवला त्याचा मला आनंद आहे .

 

“महावीर की रोटी” या उपक्रमात यापुढे शंभर गरजूंना वेगवेगळ्या प्रसंगानुसार आळंदी जैन संघाच्या व समाजातील दानशूर यांच्या माध्यमातून माऊलींची सेवा म्हणून जैन स्थानकामध्ये हा उपक्रम निरंतर चालू राहील. या पुण्ण्याच्या कार्यात सर्वांनी सहकार्य करावे ,सहभागी व्हावे व याचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले. अशा समाज उपयोगी कार्यक्रमात जैन समाज नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे असेही सांगितले .

 

याप्रसंगी शेतांबर स्थानकवासी जैन संघाचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष सतीश चोरडिया, माजी नगराध्यक्षा शारदा वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, हभप उमेश बागडे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर ,मदनलाल  बोंरूदिया ,मोहनलाल चोपडा उपस्थित होते.

 

तसेच,सागर बागमार,श्याम कोलन ,दिलीप नहार , राजेंद्र लोढा ,राजेंद्र धोका ,शांतीलाल चोपडा, सचिन बोरूंदिया, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वंभर पाटील, हनुमंत तापकीर, ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक डीएम मुंगसे सर मुख्याध्यापक प्रदीप काळे सर ,तुषार नहार, राजू बाफना, महावीर मुथा ,अविनाश बोरुंदिया नंदकुमार वडगावकर इ. तसेच सकल जैन बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये दर्शना करता आलेल्या शंभर भाविकांना अन्नदान महाप्रसाद म्हणून देण्यात आले. 49 जणांनी रक्तदान केले .त्या सर्वांना चोरडिया परिवाराच्या वतीने आकर्षक भेटवस्तू व महाप्रसाद देण्यात आले .केईएम  ब्लड बँकेचे डॉ.धुमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तसंकलनाचे काम यशस्वीरित्या पार पाडले .

 

याप्रसंगी हिराबाई सेटीया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. गौतमचंद सेटीया यांनी पन्नास जणांचे मरणोत्तर  नेत्रदानाचे फॉर्म भरून घेतले .याप्रसंगी डॉ. मनोज रांका, शैला लोढा यांनी नेत्रदानाविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली .प्रवीण चोरडिया यांनी स्व. कांतीलालजी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 

आरती मुथ्था यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित वडगावकर व कल्पना राका यांनी विशेष परिश्रम घेतले .अतुल लोढा यांनी आभार प्रदर्शन व भाग्यश्री चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. महाराजांच्या महामांगलिक व गौतम महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.