Alandi : आळंदी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – आज (दि.23) रोजी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त ग्रामदैवत श्री हजेरी मारुती जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या जन्मोत्सवानिमित्त पहाटे 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कीर्तनाचे (Alandi) आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामदैवत श्री हजेरी मारुतीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते.यावेळी हजारो हनुमान भक्तांनी  ग्रामदैवत श्री हजेरी मारुतीरायाचे दर्शन घेतले.

भाविकांना यावेळी श्रींच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.आज  ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात रात्री  9 ते 11 यावेळेत  भजन सेवा(आळंदीकर भजनी मंडळ) संपन्न होणार आहे. श्री माऊली मंदिरातील हनुमानरायाचा जन्मोत्सव सोहळा देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.तसेच सकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. माऊली मंदिर येथील काळा मारुती व इंद्रायणी घाटाजवळील(Alandi) शनी व मारुती मंदिरातील मारुतीरायाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.