Loksabha Election : संपूर्ण पुणे जिल्ह्यात खालील दिवसांसाठी ‘ड्राय डे’ घोषित

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय(पुणे) यांच्याकडून 'ड्राय डे' च्या तारखा घोषित

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय(पुणे) यांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात खालील दिवसांसाठी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात(Loksabha Election) आले आहेत.

 

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा (शिरूर,पुणे,मावळ आणि बारामती) मतदारसंघात  7 मे आणि 13 मे रोजी निवडणूक आयोगातर्फे मतदान घेण्यात येणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात  7 मे रोजी मतदान होणार असून शिरूर,मावळ आणि पुणे या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खालील दिवसांकरिता ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आले आहेत.

 

1) दिनांक 05/05/2024 (रविवार) : सायंकाळी 06.00 पासून पुढे

2) दिनांक 06/05/2024(सोमवार) : संपूर्ण दिवस

3) दिनांक 07/05/2024(मंगळवार) : सायंकाळी 06.00 वाजे पर्यंत किंवा प्रत्यक्ष मतदान संपेपर्यंत

4) दिनांक 11/05/2024(शनिवार) : सायंकाळी 06.00 पासून पुढे

5) दिनांक 12/05/2024(रविवार) :संपूर्ण दिवस

6) दिनांक 13/05/2024(सोमवार) : सायंकाळी 06.00 पर्यंत किंवा प्रत्यक्ष मतदान संपेपर्यंत.

7) दिनांक 04/06/2024(मंगळवार) :(मतमोजणीचा) संपूर्ण दिवस

वर घोषित करण्यात आलेल्या ड्राय डे दिवशी कोणीही अनुचित प्रकार करू नये असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले असून जर कोणी तसे करताना आढळले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.