Pimpri : पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन दिवस होणार गृहमतदान

एमपीसी न्यूज – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने शारीरिकदृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेले मतदार व ज्यांचे वय 85 वर्षे पेक्षा जास्त मतदार आहे, अशा मतदारांसाठी गृहमतदान प्रक्रिया रावबिण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार बुथस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करून इच्छुक मतदारांकडून 12 ड अर्ज(Pimpri) भरण्यात आलेले आहेत.

 

सदर अर्जाची छाननी करून 34 पैकी 5 दिव्यांगासह पात्र मतदारांसाठी टपाली मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. गृहमतदान प्रक्रियेसाठी मनोहर जावरानी यांची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

यासाठी गृहमतदान प्रक्रिया करण्यासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन टपाली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेकामी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकामध्ये सेक्टर ऑफीसर, पर्यवेक्षक, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस अधिकारी/कर्मचारी, सुक्ष्म निरिक्षक, बीएलओ, व्हीडीयोग्राफर यांची नियुक्ती करण्यात आली(Pimpri) आहे.

या पथकात नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांनी मंगळवारी (दि. 7) आणि बुधवारी (दि. 8) सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत गृहमतदान प्रक्रिया होणार आहे, याबाबतची पूर्वकल्पना संबधित मतदार यांना लेखी स्वरूपात दिलेली आ.हे  भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे गोपनियतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.