Moshi: दोन महिलांकडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज –  दोन महिलांनी मिळून तरुणाला विनाकारण(Moshi) शिवीगाळ व मारहाण केली. मोशीतील गंधर्वनगरी येथे इंद्रलोक काॅलनीत शुक्रवारी (दि. ३) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 
इरफान शब्बीर जमादार (वय 20, रा. इंद्रलोक काॅलनी, गंधर्वनगरी, मोशी) यांनी (Moshi)याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन संशयित महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इरफान हे त्यांच्या घरासमोरील ओढ्यावर बसले असताना काही एक कारण नसताना संशयित महिलांनी शिवीगाळ केली. शिवीगाळ का करते, असे इरमान यांनी विचारले. त्यानंतर संशयितांनी दगडाने मारून तसेच काठीने आणि हाताच्या बुक्कीने नाकावर मारून इरफान यांना जखमी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.