Bhosari:  जास्त माल उतरवून घेत सव्वा तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –  गरजेपेक्षा जास्त दुसऱ्याच कंपनीचा माल उतरवून घेत सव्वा (Bhosari)तीन लाखांची फसवणूक केली आहे.ही घटना 20 ते 22 ऑक्टोबर 2023 या कालावधीत भोसरी एमआयडीसी येथे घडली आहे.
याप्रकरणी सुधाकर शुभाकरण उपाध्याय (वय 36 रा. कळंबोली, पनवेल) यांनी(Bhosari) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून श्रीराम भागवत कुदळे व श्रेयस प्रल्हाद पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Maval : माथेरानच्या पर्यटन विकासाला  चालना – खासदार बारणे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन आले असता त्यामध्ये 20 टन 170 किलो लोखंडी सीट घेऊन गेले होते. आरोपी यांना 9 टन 40 किलो ऑर्डर प्रमाणे माल उतरवून घेणे गरजेचे होते. मात्र आरोपींनी 3 लाख 39 हजार 362 किमतीचा 4 टन 980 किलो लोखंडी सीट दुसऱ्याच कंपनीचा माल उतरवून घेत फसवणूक केली आहे. यावरून भोसरी एम आयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.